नंदूरबार २२ (प्रतिनिधी)योगेश हिरालाल अग्रवाल वय ४० वर्ष व्यवसाय व्यापार रा. मशिद जवळ विसरवाडी ता. नवापुर जि. यांच्या मालकीच्या प्रजक सिल्क मिल्स टेक्सटाइल प्रा लि रायांगण ता नवापूर येथून ६,२७,०००/- रु.कि. एकुण ३३० ताका (गठाण) कापड अज्ञात इसमाने चोरून नेला आहे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रजल सिल्क मिल्स टेक्सटाईल्स प्रा.लि. कंपनीने गोडाऊन चे मागील भिंतीची खिडकीचे बांधकाम तोडुन व खिडकीचे लोखंडी ग्रिल कश्याने तरी कापुन गोडावूनचे आत प्रवेश करुन गोडावुन मध्ये ठेवलेले नमुद वर्णनाचे व किंमतीचे कापडाचे ताका (गठाण) फिर्यादी यांचे संमतीशिवाय चोरुन नेले आहे म्हणुन योगेश हिरालाल अग्रवाल वय ४० वर्ष व्यवसाय व्यापार रा. मशिद जवळ विसरवाडी ता. नवापुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.न्या. सं. चे कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोनि शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि विशाल सोनवणे तपास करीत आहे.