Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूल मोगली येथे संविधान दिवस साजरा

 अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूल मोगली येथे संविधान दिवस साजरा
   मोलगी दि २६( प्रतिनिधी)
       अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मूळबीज शैक्षणिक संस्था संचलीत अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून प्रज्ञा महाविद्यालयाचे प्रा. रविंद्र वानखेडे तर अध्यक्षस्थानी प्रा. धनसिंग वसावे व मान्यवर म्हणून बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी हे होते.
     कार्यक्रमाची सुरुवात भारतीय  संविधानाचे जनक बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान ग्रंथाच्या पूजनाने झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे वाईस प्रिंसिपल ईश्वर वसावे यांनी केली. आणि शिक्षिका लीला पाडवी यांनी विद्यार्थी व मान्यवरांकडून संविधानाच्या उद्धेशिकेचे वाचन करुन घेतले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.रविंद्र वानखेडे यांनी बालकांना संविधानातील कलम, कर्तव्य, कायदे, सर्व शिक्षा अभियान, समानता, बंधुता व विविध अधिकाराविषयी माहिती देत मार्गदर्शन केले. त्यानंतर बार्टी संस्थेचे समतादूत ब्रिजलाल पाडवी संविधानाची सखोल माहिती त्याचबरोबर मसूदा समितीविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. धनसिंग वसावे यांनी  आपल्या अध्यक्षीय भाषणात बालपणाचे कलागुण विकास व संविधानाचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. उपस्थितांनी मान्यवरांकडून संविधानाविषयी सखोल माहिती घेतली. 
          कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेचे  प्रिंसिपल गोटूसिंग वळवी यांनी तर आभार शाळेच्या शिक्षिका मनीषा वसावे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मथुरा वसावे, मनीषा वसावे, प्राची पाडवी, सरीता पाडवी व हिराबाई वळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेच्या समितीने यशस्वीतेबद्दल कौतुक केले व भविष्यकालीन यशासाठी सुभेच्छा दिल्या.